Thursday, April 30, 2026

पोळा उत्सव हा भारतीय संस्कृतीचा परिचायक : राजेंद्र जैन

मामा चौकात तान्हा पोळा उत्साहात संपन्न
गोंदिया : पोळा सणाचे विशेष महत्व असून हा सण भारतीय संस्कृतीतील कृषी परंपरा आणि बैलांचे कृषी क्षेत्रातील महत्त्व दर्शवणारा आहे. वर्षभर शेतीची कामे करणाऱ्या, पेरणीमध्ये मदत करणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. त्यामुळे पोळा उत्सव हा भारतीय संस्कृतीचा परिचायक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

गोंदिया शहरातील मामा चौकात तान्हा पोळा उत्सव समितीच्या वतीने तान्हा पोळ्याच्या भव्य सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी माजी आमदार मा. राजेंद्र जैन यांनी बालगोपालांसह सहभाग नोंदविला व नंदी पूजन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट नंदी सजावट, वेशभूषा स्पर्धा, म्युझिकल चेअर यांसारख्या आकर्षक स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या बालगोपाळांना मिठाई व बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण परिसर तोरणे व फुग्यांनी आकर्षकरित्या सजविण्यात आला होता. विशेष म्हणजे समितीतर्फे शिव मंदिर भजन मंडळीस ध्वनीक्षेपक यंत्रणा (साऊंड सिस्टिम) भेट देण्यात आली.

जैन यांनी आयोजक नानू मुदलियार यांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप कोटामकर, प्रियेश मुदलियार, नीरज नागपुरे, स्वप्निल पिल्ले, मनोज लाडेकर, योगेश रामटेक्कर, मनोज बिसेन, अनिल इलुरु, आकाश कटकवार आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. या प्रसंगी नगरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये राजेंद्र जैन, नानू मुदलियार, सविता मुदलियार, जयसवालताई, कविता पिल्ले, श्वेता येडे, पूजा येडे, सुनीता कोटामकर, नीलिमा कोटामकर, सरिता नागपुरे, सोनल नागपुरे, पूनम चुटे, श्रीमती मेश्राम, श्रीमती बवान्थड़े, मनीषा शरनागत, श्रीमती भगत छाया कोटामकर, राजू भगत, अमोल बेलगे, डॉ. बी. डी. जयसवाल, राधेश्याम मेंढे, अश्विन क्षीरसागर, कैलास क्षीरसागर, प्रदीप कोटामकर, नंदू विश्वकर्मा, राजू सोनी, आकाश कटकवार, राजेंद्र कटकवार, पिंटू येडे, कपिल तिवारी, आकाश गायधने, गौरव अग्रवाल, रवि रहांगडाले, क्षितिज कुंडोजवार, शशांक बल्हारे, जतिन परियानी आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नीरज नागपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियेश मुदलियार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular