Thursday, April 30, 2026

नागपूर-गोंदिया प्रवास होणार आता अधिक जलद

महामार्ग उभारणीस हिरवी झेंडी मिळाल्याने मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे खा. प्रफुल पटेल यांनी मानले आभार
गोंदिया : नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गास आणि त्यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी दि.२६ ऑगस्ट ला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे या महामार्गाच्या कामाला गती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द्रुतगती महामार्ग नागपूरपासून गोंदिया पर्यंत उभारण्यात यावा यासाठी खा.श्री प्रफुल पटेल यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यानुरूप राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरवी झेंडी मिळाल्याने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी आभार मानले. नागपूर ते गोंदिया सध्याच्या महामार्गाने पोहचण्यासाठी साधारणपणे ४ तास लागतात. मात्र आता नवीन द्रुतगती महामार्गामुळे हे अंतर कमी होऊन प्रवासाचा कालावधी दीड ते दोन तासावर येणार आहे. हा महामार्ग नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील १० तालुके, ११५ गावातून जात आहे. यात २६ उड्डाणपूल, प्राण्यांसाठी ८ अंडरपास, १५ मोठे व ६३ लहान पूल, ७१ कालवा क्रॉसिंग आदिंचा समावेश आहे. तसेच गवसी, पाचगाव, ठाना, रोटरी, पांजरा, पालडोंगरी, लोहरी व सावरी अशा आठ ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. दोन महिन्यांपूर्वी शासनाने याला मंजुरी दिली होती. आता भूसंपादनाला गती येणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यावासीयांना या नवीन मार्गाची मोठी मदत होणार आहे.

रेल्वेच्या वेळेत पोहचता येणे होणार शक्य
हावडा-मुंबई या रेल्वे मार्गावर गोंदिया जिल्हा असल्याने या मार्गावर रेल्वे गाड्या नियमित धावतात. नागपूर हून गोंदियाला पोहचण्यासाठी साधारणपणे दोन ते अडीच तास लागतात. पण आता तेवढ्याच वेळात नवीन द्रुतगती महामार्गामुळे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी निश्चित दिलासा मिळाला आहे.

कृषी क्षेत्राला मिळेल चालना
नवीन द्रुतगती महामार्गामुळे गोंदिया जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड करतात. त्यांना सुद्धा या नवीन द्रुतगती महामार्गाने शेतमालाची जलद वाहतूक करणे शक्‍य होवून चारपैसे अधिकचे मिळवून घेण्यास मदत होणार आहे.

१४५ किमीचा असणार हा महामार्ग
हा एक्सप्रेस वे गवसी मानापूर ते गोंदिया शहराजवळील सावरी पर्यंत १४५ किमी लांबीचा असेल. तेथून प्रवासी शहरात प्रवेश करू शकतील. भंडारा मार्गे सध्याचा महामार्ग मार्ग सुमारे १६१ किमी व्यापतो. मुख्य मार्गाव्यतिरिक्त, प्रकल्पात तिरोडाला जोडणारा १४ किमीचा आणि गोंदियाजवळील ४ किमीचा बायपास रस्ता समाविष्ट आहे, ज्यामुळे प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे १६३ किमी झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular