भंडारा : खासदार श्री प्रफुल पटेल हे रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता पासून भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते भंडारा शहरातील विविध श्री गणेश उत्सव मंडळांना भेट व दर्शन घेणार आहेत.
श्री गणेश दर्शन दरम्यान गणेशपूरचा राजा – सन्मित्र गणेश मंडळ (गणेशपूर), मानाचा महागणपती – नवबजरंग गणेशोत्सव मंडळ (बजरंग चौक), म्हाडाचा गणपती – म्हाडा कॉलनी, भृशुंड गणेश मंदिर – मेंढा रोड, भंडाराचा राजा – गणेश उत्सव मंडळ (छोटा बाजार गांधी चौक) तसेच श्री धनंजय दलाल यांचे निवासस्थान दलाल कॉम्प्लेक्ष मागे येथे भेट व दर्शन घेतील. या दर्शन दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.





