Wednesday, January 21, 2026
spot_img

अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; ४ दुचाकीसह १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया शहर पोलिसांची पथकाची कामगिरी
गोंदिया : अनेक ठिकाणातून अनेक विविध कंपन्यांची दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाऱ्यास गोंदिया शहर पोलिसांना अटक करण्यास यश मिळाले. चोरट्याकडून पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा ४ दुचाकी जप्त केला. लखपती ऊर्फ लख्ख्या बस्ताराम फेंडर (वय ३९ वर्षे, रा. पिंजारी मोहल्ला वाराशिवनी (म.प्र.) ह.मु. हनुमान मंदीर जवळ भरतवाडा नागपुर) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी श्री. अमीत जगदीश तांडेकर (वय २५ वर्षे, रा. पाऊलदौना ता. सालेकसा जि. गोंदिया) यांची हिरो होन्डा एन.एक्स.जी. मोटार सायकल क्र. एम.एच.३५/ यु ६४४९ किं.अं. ३०,०००/- रु. ची कोणीतरी अज्ञात चोराने रेल्वे स्टेशन गोंदिया च्या पार्सल ऑफीस समोरुन दि. २४/०८/२०२५ चे ६.०० वा. ते २५/८/२०२५ चे दुपारी २.०० वा. दरम्यान चोरुन नेल्याने दि. ०४/०९/२०२५ रोजी फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्र. ७३७/२०२५ क. ३०३ (२) भा.न्या.सं. २०२३ अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात अज्ञात आरोपीचा शोध सुरु होते. पो.स्टे. गोंदिया शहर येथील पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात डी.वी. पथकातील पोलीस अंमलदार हे सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान अभिलेखावरील सराईत आरोपी नामे लखपती ऊर्फ लख्ख्या बस्ताराम फेंडर (वय ३१ वर्षे, रा. पिंजारी मोहल्ला वाराशिवनी (म.प्र.) ह.मु. हनुमान मंदीर जवळ भरतवाडा नागपुर) यास दि. ८/९/२०२५ रोजी अटक करण्यात आले. सदर आरोपीस अटक करुन त्याच्याकडे सदर गुन्ह्याचे चोरीस गेलेल्या दुचाकीबाबत सखोल विचारपूस करण्यात आले असता त्याने सदर गुन्हयातील चोरीस गेलेली हिरो होन्डा एन.एक्स. जी. मोटार सायकल क्र. एम.एच.३५/ यु ६४४९ किं.अं. ३०,०००/- रु. ची तसेच गोंदिया शहरातील अन्य ठीकाणाहुन चोरीस गेलेल्या १) बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल क्र. एम.एच.३५ ए.वाय. ०३९३ किं.अं. ७०,०००/-रु., २) हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्र. एम.एच.३५ ए.सी. ७७२९ किं. ४०,०००/- रु., ३) हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटार सायकल क्र. एम.एच.३५ ए.के. ०८४७ किं. ३५,०००/- रु. अशा एकुण १,७५,०००/- रु. च्या मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. नमुद चारही दुचाकी एकुण किं. १,७५,०००/- रु. च्या पोलीसांनी सराईत आरोपी लखपती ऊर्फ लख्ख्या बस्ताराम फेंडर, वय ३९ वर्षे, रा. पिंजारी मोहल्ला वाराशिवनी (म.प्र.) ह.मु. हनुमान मंदीर जवळ भरतवाडा नागपुर याच्याकडुन जप्त केल्या आहेत. अशाप्रकारे डी. बी. पथकाने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथील चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघड केले आहे.

यांनी केली कारवाई…
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी. बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सतिश शेंडे, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, पो.शि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे, कुणाल बारेवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular