Monday, January 19, 2026
spot_img

गोंदिया जिल्हा भाजपच्या उपाध्यक्षपदी विजय कापगते

अर्जुनी-मोर., (गोंदिया) : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेशानुसार गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष सीताबाई रहांगडाले यांनी अर्जुनी-मोर. तालुक्यातील भाजपाचे युवा कार्यकर्ता विजय नामदेवराव कापगते यांची गोंदिया जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
गोंदिया येथे तालुक्यातील 12 सप्टेंबर रोजी भाजपच्या वतीने आयोजित सेवा पंधरवाडा 2025 या कार्यक्रमात विजय कापगते यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विदर्भ संघटनमंत्री डाॅ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष सीताबाई रहांगडाले, जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी मंत्री तथा आमदार डाॅ. परिणय फुके, आमदार चित्रा वाघ, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, भाजपा संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, नेतराम कटरे, पंकज रहांगडाले व अन्य भाजपा नेते प्रामुख्याने उपस्थित होते. विजय नामदेवराव कापगते हे अर्जुनी-मोर. तालुक्यातील भाजपाचे युवा कार्यकर्ते असुन त्यांनी आतापर्यंत अर्जुनी-मोर. तालुका भाजपा अध्यक्ष पदाची कमान यशस्वीरित्या सांभाळली होती. तसेच ते अर्जुनी-मोर. नगरपंचायतचे नगरसेवक असुन तालुका खरेदी विक्री समितीचे उपाध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांचे कार्यकतृत्वाची दखल घेवुन विजय कापगते यांची गोंदिया जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपन यशस्वीरित्या पार पाडु व पक्षसंघटन मजबुतीसाठी प्रयत्न करु असे विजय कापगते यांनी म्हटले आहे. विजय कापगते यांचे नियुक्तीबद्दल गोंदिया जिल्ह्यातील व अर्जुनी-मोर. तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular