Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

जिल्हा नियोजन भवन इमारतीचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हस्ते उद्घाटन

गोंदिया : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा नियोजन भवन इमारतीचे उद्घाटन आज राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंग कार्यक्रमात सर्वश्री खासदार डॉ.प्रशांत पडोळे, डॉ.नामदेव किरसान, सर्वश्री आमदार डॉ.परिणय फुके, डॉ.अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजकुमार बडोले, संजय पुराम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत भव्य आणि सुसज्ज, अशी जिल्हा नियोजन भवन इमारत तयार करण्यात आली. सदर इमारतीत आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सदर नियोजन भवन हे विधानभवन इमारत सारखी बनविली आहे. जिल्हा नियोजन भवन इमारतीच्या बांधकामासाठी 11 कोटी 93 लक्ष 62 हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. सदर नियोजन भवन इमारतीत 251 नागरिक बसू शकतील अशी बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular