देवरी, (गोंदिया) : शेतात जात असताना, वाटेत शौच लागल्याने पाय घसरून पडलेल्या 31 वर्षीय विवाहितेचा बोडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना देवरी तालुक्यातील सालेकसा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम महाजनटोला/ पुराडा येथील बुधवार , 17 सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे 6.30 वाजेच्या सुमारास घडली. सरिता ओमप्रकाश आचले (वय 31) असे मृतक विवाहितेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुराडा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या ग्राम महाजनटोला/पूराडा येथील सरिता ओमप्रकाश आचले (वय 31) ही विवाहिता बुधवारला सकाळच्या दरम्यान शेतात जात होती. सरिताला वाटेत शौच लागल्याने ती शेताकडे जाणाऱ्या वाटेवर एक बोडी असून, त्यात तिचा पाय घसरल्याने ती बोडीच्या पाण्यात पडली. शेतात गेलेली सरिता घरी लवकर परत न आल्याने, कुटुंबीयांनी इतरत्र शोध घेतला. सकाळी अंदाजे 8 वाजे दरम्यान शेताजवळील बोडीतील पाण्यात मृतक विवाहितेचा मृतदेह तरंगताना आढळला. या घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.
पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू; महाजनटोला येथील घटना
RELATED ARTICLES





