Wednesday, January 21, 2026
spot_img

झोपेत असलेल्या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; हळदी गावातील घटना

चिचगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद
देवरी, (गोंदिया) : मध्यरात्री दरम्यान घरात झोपलेल्या तरुणाला सर्पदंश झाल्याने, मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सदर घटना देवरी तालुक्यातील गट ग्रामपंचायत फुटाणा अंतर्गत ग्राम हळदी येथे घडली. प्रमोद मारोती भोयर (वय २३) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील फुटाणा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या हळदी येथील रहिवाशी मारुती भोयर हा शेतकरी आहे. कुटुंबात दोन मुले, दोन मुली, असून लहान मुलगा प्रमोद सोबत शेतमजुरी करून आनंदाने राहत होता. परंतु, या सुखी आनंदी परिवाराला काळाने झेप घालून, एका झटक्यात होत्याचं नव्हतं केलं. शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी मारोती भोयर परिवारातील सदस्य रात्रीचे जेवण करून झोपी गेले. मृतक प्रमोद भोयर खाटेवर गाढ झोपेत असताना मध्यरात्री १२.३० वाजे दरम्यान प्रमोदला काहीतरी चावल्याचा भास झाला. त्यात मृतकाने उठून बघितले असता, खाटेवर साप आढळला. लगेच त्यांनी कुटुंबीयाला माहिती दिली. त्याचवेळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सदर घटनेतील सापाला मारण्यात आले. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे भोयर कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. चिचगड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. अचानक ओढवलेल्या दुःखामुळे गावात शोककळा पसरली आहे.

भोयर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर…
यात विशेष म्हणजे सदर घटना घडण्याच्या पंधरा दिवसापूर्वीच मृतकाच्या आईचे निधन झाले होते. घरात दोन मुले, दोन मुली असून मोठ्या मुलाचा तसेच दोन मुलीचा विवाह झाला आहे. परिवारातून सर्वात लहान असलेला मृतक मुलगा म्हणजेच प्रमोद याच्यासह वडील राहत होता. आईच्या निधनाने कुटुंब दुःखातून सावरण्या अगोदरच दुसरी घटना घडल्याने भोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular