Monday, April 13, 2026
spot_img

कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी पीक प्रात्यक्षिकेसाठी अर्ज करावे

गोंदिया : अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत सन 2025 या वर्षात रब्बी हंगामामध्ये कडधान्य, भात पडक्षेत्र कडधान्य, भरडधान्य पिके, पौष्टिक तृणधान्य रब्बी पीक प्रात्यक्षिके कृषि विभागाकडून राबविण्यात येणार आहेत. सदर पीक प्रात्यक्षिके हरभरा, रब्बी ज्वारी व मका हे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि क्षेत्रात काम करणारी संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर प्रात्यक्षिकासाठी इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि क्षेत्रात काम करणारी संस्था यांनी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ संकेतस्थळावर अर्ज करावेत.
अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी : शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणी केलेला असावा. जसे की, आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नोती अभियान (MSRLAM), राष्ट्रीय जिवोन्नती अभियान (MRLM), महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने 25 शेतकऱ्यांची निवड करावी. पीक प्रात्यक्षिकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट/कंपनी/संस्था निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS), या तत्वावर करण्यात येईल. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देतांना Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी गटाची निवड ही महाडीबीटी पोर्टलद्वारे होणार असल्याचे कृषि विभागाकडील विहित नमुन्यातील हमीपत्र देण्यास तयार असावे. पीक प्रात्यक्षिकाची निवड करतांना अनुसूचित जातीसाठी 12 %, अनुसूचित जमातीसाठी 9 %, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79 % याप्रमाणे खातेदारांच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांची निवड करुन यामध्ये वनपट्टाधारक शेतकरी व दिव्यांग शेतकऱ्यांची प्रथम प्राधान्याने निवड करण्यात यावी. लाभ द्यावयाच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 30 % महिला लाभार्थी असावे. तरी जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कपंनी व कृषि क्षेत्रात काम करणारी संस्था यांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular