Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

महामार्गावर उभ्या ट्रकला आग; ट्रक जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

शिरपूरबांध सीमा तपासणी नाक्याजवळील घटना
गोंदिया : देवरी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्याजवळ एका उभ्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. ही घटना सोमवार २२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तरी चालकाला किरकोळ दुखापत झाली असून ट्रक मधील टायर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
देवरी शहरापासून काही अंतरावर मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर सीमा तपासणी नाका असून अनेक ट्रक चालक आपले वाहन या परिसरात उभी करतात. दरम्यान, घटनेच्या वेळी ट्रक चालक कॅबिनमध्ये स्वयंपाक करत असताना गॅस पाईप लिक झाल्याने कॅबिनमध्ये आग लागली. विशेष म्हणजे, ट्रक मध्ये टायर भरले असल्याने क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. ज्यामुळे संपूर्ण ट्रक जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीव हानी झाली नाही. मात्र, आगीमुळे चालकाला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, अग्निश्मन वाहनाला पाचारण करून आग विझविण्यात आली. या घटनेमुळे काही वेळ सीमा तपासणी नाका परिसरात एकच तारांबळ उडाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular