Monday, April 13, 2026
spot_img

स्वच्छतेच्या ‘एक दिवस, एक घंटा, एक सोबत’ उपक्रमांत सहभागी व्हा! : मुकाअ एम. मुरूगानंथम

‘स्वच्छता ही सेवा’ : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छोत्सव…
गोंदिया : 17 सप्टेंबर पासून स्वच्छता ही सेवा या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार असून 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9 या वेळात संपूर्ण जिल्हयात ‘एक दिवस, एक घंटा, एक सोबत’ हा श्रमदानातून स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांत जिल्हयातील सर्व पंचायत समिती, त्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आणि नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी केले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर पासून स्वच्छता ही सेवा उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे. ‘स्वच्छोत्सव’ ही यावर्षाची थीम असून या पंधरवाडयात विविध उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. उपक्रमांचा शुभारंभ करून जिल्हयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. टाकावू पासून टीकावू वस्तू तयार करणे, कचरा वर्गीकरण चर्चा, शालेय स्तरावर कविता स्पर्धा, पोस्टर, पेंटीग, घोषवाक्य, प्रश्न मंजूषा सारख्या स्पर्धा घेणे, एकल प्लास्टीक न वापरण्याबाबत जनजागृती करणे, शून्य कचरा उपक्रम, वैयक्तीकस्तरावर कंपोस्ट खत खड्डा, शोष खड्डा निर्मीती करणे, अस्वच्छ ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता करणे, स्वयंस्फूर्तीने लोकसहभागच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे, गृहभेटीतून जनजागृती करून एक झाड आईच्या नावे उपक्रम राबविणे, बचतगट व एनजीओ च्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण करणे. स्वच्छता ज्योत, मॅरेथॉन, सायकल मॅरेथॉन, स्वच्छता रॅली, मानवी साखळी सुध्दा आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान 25 सप्टेंबर रोजी ‘एक दिवस, एक घंटा, एक सोबत’ हा श्रमदानातून स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यवसायिक बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळे, नदी किनारे, घाट नाल्यांच्या परिसरात हे स्वच्छता अभियान राबवायचे आहे. 26 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत निर्मीत करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करणे, 27 सप्टेंबर रोजी लेगसी वेस्ट साईटची साफसफाई करणे. 28 तारखेला सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन करणे, 29 तारखेला एक दिवस एक तास शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयावर धडे देणे, 30 सप्टेंबरला स्वच्छतेचे वाहन व उपकरणे यांची स्वच्छता व नूतनीकरण करणे, 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा आणि 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिवस साजरा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. सर्व उपक्रम राबविण्याचे गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय लोंढे यांनी कळविले आहे. तथा महाश्रमदानात प्रत्येक व्यक्तीने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular