Tuesday, September 15, 2026
spot_img
spot_img
spot_img

नाल्यात आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या?

सडक अर्जुनी तालुक्यातील देवपायली येथील घटना
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील देवपायली येथील नाल्यात एक इसम मृत अवस्थेत आढळून आला. मृतकाचे नाव प्रल्हाद मडावी (वय 56, रा. मंदिटोला) असे असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या हा चर्चेचा विषय आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2025 रोजी उघडकीस आली.
या घटनेची माहिती गावाचे पोलिस पाटील सुरेश बोरकर यांनी तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे बीट अंमलदार विजय कोटांगले व गणेश पवार घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular