Wednesday, April 29, 2026

इर्री येथे नाभिक समाजातर्फे जयंती महोत्सव व सत्कार सोहळा ९ ऑक्टोबरला

समाजातील गुणवंत विद्यार्थी व गणमान्य नागरिकांचा होणार सन्मान
गोंदिया : तालुक्यातील इर्री (नवरगाव कला) येथे नाभिक वार्ता पब्लिकेशन व सकल नाभिक समाजाच्या वतीने समाजाचे आराध्य दैवत संतश्री नगाजी महाराज यांची पुण्यतिथी व शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती महोत्सव गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरूवात सचिन तेंडुलकर क्रिकेट ग्राउंड येथे सकाळी १० वाजतापासून होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलाईचे आमदार रिकेश सेन राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी दिप प्रज्वलक म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, प्रतिमापूजक माजी मंत्री परिणय फुके, जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, खासदार नामदेवराव किरसान, खासदार प्रशांत पडोळे, माजी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार राजेंद्र जैन प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तर अतिथी म्हणून आमदार विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, आ. नरेंद्र भोंडेकर, आमदार राजूभाऊ कारेमोरे, भंडारा जि.प. अध्यक्ष कविता उके, माजी आमदार रमेश कुथे, गोपालदास अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहेषराम कोरोटे, दिलीप बन्सोड, केशव मानकर, भैरसिंग नागपुरे, हेमंत पटले खोमेश रहांगडाले, माजी अध्यक्ष के.आर. शेंडे, विजय शिवणकर, नेतराम कटरे, पंकज रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त कर्मचारी- अधिकारी, राज्यस्तरीय समाजरत्न, कोरोना योद्धा, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य परिचारिका आदिंचा मान्यवारांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार होणार आहे. उल्लेखनिय असे की, याप्रसंगी विशेष सत्कारमूर्ती म्हणून शिवरत्न शिवाजी काशीद यांचे १३ वे वंशज आनंद काशीद व नाभिक समाजातील आयएएस नुपूर श्रीवास यांचे वडील समाजरत्न अजय श्रीवास यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष बेनीराम फुलबांधे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular