Sunday, January 18, 2026
spot_img

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न

गोंदिया, दि.7 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शासकीय वैद्यकाय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या नेतृत्वात रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आयोजित रोग निदान व उपचार शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग किशोर माधवराव भोयर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगंबर मरसकोल्हे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष नारायण प्रसाद जमाईवार, धुलीचंदजी बुंदे, लखन शेठ कटरे आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला व पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी उपस्थित जेष्ठ मान्यवर व लाभार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन शासन सेवेत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयी ज्या सेवा व सुविधा विनाशुल्क दिल्या जातात त्याची माहिती. तसेच ज्येष्ठ नागरिकाच्या सेवेकरिता विशेष करून ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेता येईल त्याकरिता आठवड्यातील गुरुवार आणि शुक्रवार वेळ तीन ते चार या वेळे विविध तज्ञ आपल्या सेवें करता उपस्थित राहतील असे आवाहन अधिष्ठात डॉ कुसुमाकर घोरपडे यांनी आयोजित कार्यक्रमात केले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगंबर मरसकोल्हे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत व आभार याबद्दलची आरोग्य सेवेत तसा लाभ घेता येतो सविस्तरपणे माहिती देण्यात आली. १३५६ आजारावर विनाशुल्क लाभ घेता येते अशी त्यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी जेष्ठ नागरिक आणि उपस्थित मान्यवरांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात थोडक्यात माहिती दिली. मानसोपचार तज्ञ डॉ. स्नेहा शर्मा यांनी चिडचिडेपणा व एकाकीपणावर सखोल मार्गदर्शन केले. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सिद्ध साधून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना झाली आणि जिल्ह्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ घेण्याकरता कोण कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते आणि कोण कोणत्या आजारावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष काम करू शकते याबद्दलची सविस्तर माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख डॉक्टर मुकेश येरपुडे यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. सध्या महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या पूर परिस्थितीत शेतकरी व शेतमजूर आणि गावकऱ्यांची पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसाना होणाऱ्या हालअपेष्टा याचा विचार करून लगतच्या भागातील संकटात सापलेल्या आपल्या भावाबंधाला एक हात मदतीचा म्हणून सढळ हाताने दान करावे, असे आवाहन यावेळी केले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक मारुती बापूराव कुचनकर, नारायण प्रसाद जमाईवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सचिव श्री धुलेचंद बुंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औचित्य साधून आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून रोग निदान व उपचारात शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालय येथे आयोजन आले. या शिबिरात 75 लाभार्थ्यांनी लाभ घेतला त्यात विविध तज्ञांनी मेडिसिन विभागाचे तज्ञ स्त्री रोग तज्ञ अस्त्यंग उपचार तज्ञ मानसोपचार तज्ञ पॅथॉलॉजिस्ट नेत्ररोग तज्ञ अशा विविध तज्ञ डॉक्टरांनी रोग निदान व उपचार शिबिरात सेवा दिली. त्यात रक्ताच्या चाचण्या आणि औषध वितरणासह रोग निदान शिबिर पार पडले या कार्यक्रमात प्राध्यापक व विभागप्रमुख डॉक्टर प्रशांत बागडे डॉक्टर मनू शर्मा व इतर डॉक्टर मंडळी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता परिचारिका मीनाक्षी भीषण व त्यांची ची टीम तसेच अंकित बंधनवार जिल्हा समन्वयक अभिषेक घालावी आणि वैद्य तपासणी शिबिर जमू यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन आणि आभार डॉक्टर प्राजक्ता ऐरमवार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular