भंडारा : आज भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय, भंडारा येथे माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्दे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. सुनिल फुंडे आणि महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सरिताताई मदनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत आगामी भंडारा नगर परिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा व विचारमंथन करण्यात आले. नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवकांच्या उमेदवारी संदर्भातील अंतिम अधिकार आदरणीय खासदार श्री. प्रफुल पटेल यांना देण्यात आला असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, पक्षाच्या विजयासाठी तात्काळ निवडणूक तयारीला लागावे. भंडारा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात सभा घेण्यात याव्यात आणि त्यात विशेषतः तरुण युवक व युवती वर्गाचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात यावा असे मार्गदर्शन करतांना त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी बैठकीला सर्वश्री महेंद्र गडकरी, अड. विनयमोहन पशिने, परवेज पटेल, नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, डॉ. रविंद्र वानखेडे, शेखर (बाळाभाऊ) गभने, नारायणसिंह राजपुत, योगेश हेडाऊ, राहुल निर्वाण, अॅड. नेहा शेंडे, राजु पटेल, सुनिल साखरकर, विक्रम उजवणे, लोकेश खोब्रागडे, जवाहर निर्वाण, बल्ली भाई विजय खेडीकर, राजू सतदेवे, मनिष वासनिक, प्रदिप सुखदेवे, संजय सतदेवे, उमेश ठाकरे, मंजुषा बुरडे, भोजराज वाघमारे, महेंद्र वाहाणे, राहुल निर्वाण, अशोक सांडेकर, सुमित शामकुंवर, सुरेश थोटे, किरण हेडावु, राजेंद्र आनंद प्रशांत देशकर, नितीन शेबरे, अमन मेश्राम, खुशाल निपाने, राजेश्री राखडे, इंदू येरकडे, धनवंता बोरकर, किर्ती कुंभरे, रफीका शेख, अ. कलाम शेख, रिजवान खान, मेहमुद खान, लियाकत खान, अरुण भेदे, गणेश चौधरी, रामेश्वर पराते, संजय वरगंटीवार, ओमप्रकाश चव्हाण, अजय निखार, लोकेश नगरे, तौसिफ तहिर, फरहान पटेल, शाहरुख ताहीर शेख, बाबुराव पुडके, संतोष राजगिरे, मुन्ना ठाकुर, उत्कर्ष राखडे, मोहित सार्वे, सुनिता आगलावे, वंदना तुरस्कर, अफसाना बेगम, दिक्षा निपाने, शुभा पडोळे, रवि लक्षणे, अंबादास मंदुरकर, अक्षय भोतमांगे, सोहेल अहमद, सुषमा माटे, रेणुका धकाते, गीता मेश्राम, राहुल वाघमारे, रिजाज पठाण, फैज खान दतू नागमोते, धनंजय ढगे, दिपक मेश्राम, मोहित पाटेकर, पियुष न्यायकरे, सिमरनभारती गणविर, सुनिल भांडारकर, गीता मेश्राम, रुचिता आग्रे, सुनिल मोगरे, रूपेश टांगले, प्रकाश येरकडे, राजु साठवणे, सुषमा साखरकर, भारत लांजेवार, शैलेन्द्र पशिने, बबन मेश्राम, विद्या साखरे, लता मेश्राम, संगिता चव्हाण, गणेश बाणेवार, संजय वरगंटीवार, व फार मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





