Wednesday, January 21, 2026
spot_img

फत्तेपूर येथे कोजागिरीनिमित्त भजन मंडळींचा सत्कार

गोंदिया : तालुक्यातील फत्तेपूर येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने ओम सेवा भजन मंडळांच्या सदस्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
नवयुवक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने फत्तेपूर येथे कोजागिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाचे औचित्य साधून मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी ओम सेवा भजन मंडळाचे सदस्य माणिकचंद मेश्राम, जेष्ठ सहयोगी पारधी, पोलिस पाटील श्रीमती भुमेश्वरी रीनायत, हभप कटकरे महाराज व काही सामजिक कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष दिनेशकुमार कटरे, पारेख कटरे, धनंजय रिनायत, अंकुश पारधी, गजानन फुंडे, शुभम येडे, डुग्गूकुमार रिनायत, विशाल सोनवाने, विष्णुकुमार यादव, चंद्रशेखर पटले, चिंटूकुमार बिसेन व सर्व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular