Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक यांची गोंदियात आरोग्य कार्यशाळा

गावपातळीवर सक्षम व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यावर भर
गोंदिया : राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक तसेच अवर सचिव संजय डगले यांच्या उपस्थितीत बुधवारी मयुर लॉन, गोंदिया येथे आरोग्य विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्वस्तरीय आरोग्य पथकांसोबत थेट संवाद साधत त्यांनी आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, तसेच विविध विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विनायक यांनी गावपातळीवरील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत खालील सूचनांवर विशेष भर दिला. गर्भवती माता, बालके, किशोरवयीन, ज्येष्ठ नागरिक यांची नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, मुख-दंत, नेत्र तपासणी यांसारख्या मूलभूत सेवांचे गावातच उपलब्धता, लसीकरण, मानसिक आरोग्य समुपदेशन, संतुलित आहार आणि योगा याबद्दल जागृती करावी अशा सूचना दिल्या. गावपातळीवरील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी ग्रामसभा, आरोग्य समित्या आणि जनजागृती अभियान यांचा प्रभावी वापर करावा.

आयुष्मान आरोग्य मंदिर सेवांचा आढावा…
सद्यस्थितीत आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत देण्यात येणाऱ्या तेरा प्रकारच्या आरोग्य सेवांची माहिती, तसेच सेवा वितरणातील अडचणी व सुधारणा उपाय याबाबत डॉ. विनायक यांनी प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. गुणवत्तापूर्ण आणि तत्पर आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा संकल्प…
कार्यशाळेदरम्यान आरोग्य सुविधा, रुग्णालयीन सेवा, पायाभूत सोयी-सुविधा तसेच समुदाय आरोग्य प्रणाली मजबूत करण्यावर व्यापक चर्चा झाली. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उत्साहाने उपस्थित राहिल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular