Friday, April 17, 2026
spot_img

पत्रकार खेमेंद्र कटरे यांना मातृशोक

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथील प्रतिष्ठित नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिरदीलाल कटरे यांच्या पत्नी ताराबाई कटरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज ६ एप्रिल रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवार, ७ एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता दवडीपार या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्या बेरार टाईम्सचे संपादक वरिष्ठ पत्रकार, ओबीसी चळवळीचे सक्रिय पदाधिकारी खेमेेंद्र कटरे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे सेवानिवृत्त कार्य. अभियंता संजय कटरे, से.नि. शिक्षक राजेंद्र कटरे, शिक्षक अजय कटरे व खेमेंद्र कटरे अशी ४ मुल, सुना व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular