Saturday, May 30, 2026

उपविभागीय प्रयोगशाळेला विद्यार्थ्यांची भेट

जागतिक ॲक्रेडीएशन दिन : पाणी गुणवत्तेबाबत जागरूकता
गोंदिया : जागतीक ॲक्रेडीएशन दिनानिमीत्त जिल्हयातील जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळेला सर्व सामान्य नागरीकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात भेटी दिल्या असून पाणी गुणवत्तेबाबत नागरीकांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जागतीक ॲक्रेडीएशन दिनानिमीत्त जिल्हयातील जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळा सर्वसामान्य नागरीकांच्या भेटी करीता सुरु ठेवण्यात आल्या होत्या. भेट देणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्याची तपासणी, प्रयोगशाळेचे ॲक्रीडीएशन, अणुजैविक व रासायनिक पाणी नमुने तपासणीची पध्दत, प्रयोगशाळेतील उपकरणे, केंद्रशासनाच्या संकेत स्थळावर नोंदी करण्याबाबत माहीती देण्यात आली. तपासणीचे अहवाल प्राप्त् करुन घेण्यासंदर्भात प्रयोगशाळेचे रसायनी व अणुजैविक तज्ञ यांनी सखोल मार्गदर्शन केले. यासोबतच भेट देणा-या व्यक्तीने सोबत घेवुन आलेल्या पाण्याचे नमुन्यांची प्रत्यक्ष तपासणीसह प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात आले. दरम्यान वरीष्ठ भुवैज्ञानिक, एन. पी .कनोजे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रयोगशाळा गोंदिया येथे जागतीक ॲक्रीडीएशन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कनोजे यांनी पिण्याच्या पाण्याचे महत्च, पाणी तपासणी का करावी, या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.. त्रिपाठी यांनी, जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण लोकांना शुद्ध व स्वच्छ पाणी कसे उपलब्ध करुन दयावयाचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा प्रयोगशाळेत गोंदिया येथे धोटे बंधु महाविद्यालयातील विद्यार्थीनी मिनाक्षी पटले, तुलसी बागडे, डिपंल बसोने, रिना कटरे यांनी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत पिण्याच्या पाण्याच्या ३ ते ४ घटकांची तपासणी करून माहीती जाणून घेतली. उपक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा सनियंत्रण कक्षाचे उपविभागीय सल्लागार प्रदीप शरणागत, रुकेशसिंह देसाई, रसायनी सुनील गराडे, अणूजैविक तज्ञ भारती पटले, श्री.राठोड यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular