क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजन
गोंदिया : मरार समाज कल्याण समिती जिल्हा गोंदियातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गोंदिया जिल्ह्यात सामान्यज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली. परीक्षेचे आयोजन रविवार, ११ जानेवारी रोजी करण्यात आले होते. ही परीक्षा जिल्ह्यातील ४ केंद्रावरून १०५० विद्यार्थ्यांनी दिली.

सदर परीक्षा सामान्यज्ञान, गणित, इंग्रजी, आणि बुद्धिमत्ता या चार विषयावर घेण्यात आली. ज्यामध्ये तीन गट तयार करण्यात आले होते. पहिला गट इयत्ता दुसरी ते पाचवी, दुसरा गट इयत्ता सहावी ते आठवी आणि तिसरा गट इयत्ता नववी ते पदवी असे तीन गट करून गटानुसार तीन पेपर संच विद्यार्थ्यांना देण्यात आले. परीक्षा सुरू होण्याची आधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व लगेच परीक्षेला सुरुवात करण्यात आली. या परीक्षेत सर्व माध्यमातील १०५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यात ही परीक्षा मरार समाज कल्याण समिती जिल्हा गोंदियाचे अध्यक्ष आत्माराम पाचे, महासचिव तरुण देशमुख, सचिव अमेश पाचे, शिक्षाप्रकोष्ठ प्रमुख रामभगत पाचे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यशस्वितेसाठी श्रवणजी खैर, श्यामकुमार पाचे, बी एल पंचेश्ववर, श्यामदास जामरे, राजकुमार मात्रे, भंडारी चौधरी, रोहिदास कावरे, सुखलाल बाहे, सुखदेव बिसेन, जगदीश पंचेश्ववर, मनोहर ठाकरे, धीरज माने, योगेश माने, प्रकाश पाचे, राजेंद्र माने, गुलाब पाचे, रवि जामरे, भिकाराम माने, राजेश बाहे, राजेश दांदरे, रितू माने, निशा हिरवाणे, ललित माने, शिक्षक मेश्राम, शिक्षक देशकर, मुन्नालाल मरठे, विजय कावरे, ओंकार पाचे, रवेंद्र पाचे यांनी सहकार्य केले.



