गोंदिया : पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे 31 मे 2026 रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी, असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने ३१ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे रामदास शेवते प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मपोका पल्लवी वैभव गजभिये यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली. सदर कार्यक्रमात रामदास शेवते प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार हे उपस्थित होते.



