Monday, September 14, 2026
spot_img
spot_img
spot_img

गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध पोलिसांची धाड; आरोपी फरार

कामठा येथून अवैध गांजासह 20 लाखांचा नोटा जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामठा येथे अमली पदार्थ गांजा घरी बाळगून अवैध विक्री करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने धाड टाकून कारवाई केली. ही कारवाई रविवार, 25 मे रोजी करण्यात आली. घरझडतीत स्कूल बॅगमध्ये अवैधरित्या ठेवलेला 12 हजार रुपयांचा 600 ग्रॅम गांजा व 500 रुपये दराच्या एकुण 4000 नोटा (वीस लक्ष रुपये) असा एकुण 20 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचे नाव उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल (वय 25, राहणार कामठा) असे आहे.

उल्लेखनीय असे आहे की, पोलीस अधीक्षक गोरख भामरे , अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे निर्देश सूचनाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई करण्यासाठी प्रभावी धाड मोहीम राबविण्यात यावी असे निर्देश सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिले आहेत. या अनुषंगाने संपुर्ण जिल्हास्तरावर एन.डी. पी.एस. (NDPS) कायद्यान्वये कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. वरिष्ठांचे निर्देशा प्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी, साठा, वापर, विक्री व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मोहीम छेडत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 मे रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे गोंदिया तालुक्यातील कामठा येथे गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध धाड कारवाई करण्यात आली. यात आरोपी उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल (वय 25 वर्षे) हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे त्याची आई ललिता अग्रवाल यांच्या समक्ष, प्रतिष्ठित पंचासह त्याचे राहते घराची घरझडती घेवून पाहणी केली. या घर घरझडतीत लोखंडी आलमारीत एका निळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये विक्री करिता साठवून ठेवलेला 600 ग्रॅम ओलसर, पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किंमती 12000 रुपये तसेच गांजाच्याच बॅग मध्ये गांजा विक्रीच्या पैश्यातून साठवून ठेवलेली रक्कम 500 रुपये दराच्या एकुण 4000 नोटा असा एकुण किंमती 20 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर संबंधात आरोपीची आई ललिता अग्रवाल यांना विचारपूस केली असता मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा व रकमेबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून मुलगाच सांगू शकतो असे सांगितल्या. त्यामुळे अवैधरित्या गांजा व रक्कम साठवणूक केल्याची खात्री झाल्याने जप्तीची रीतसर कायदेशीर कारवाई प्रक्रिया करून मुद्देमाल जप्त करण्यात आले. फरार आरोपीविरुद्ध रावणवाडी पोलीस ठाणे येथे पो.उप.नि. शरद सैदाणे यांच्या तक्रारीवरून एन. डी.पी. एस. कायद्याचे कलम 8 (क), 20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. तपास रावणवाडी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे दिशा निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रोहिणी बानकर यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मपोउपनि वनिता सायकर, पोउपनि. शरद सैदाने, अंमलदार राजू मिश्रा, महेश मेहर, दुर्गेश तिवारी, सुजित हलमारे, सोमेंद्र तुरकर, संतोष केदार, कुमुद येरणे, घनश्याम कुंभलवार यांनी कारवाई केली आहे.

बऱ्याच काळापासून परिवार करताहेत गांजाचा व्यवसाय…
यात उल्लेखनीय बाब अशी की, कामठा येथील फरार आरोपी उमेश याचा भाऊ घनश्याम अग्रवाल, मयत वडील हरिचंद अग्रवाल आणि ईतर साथीदार 1 यांचा ताब्यातून 2021 मध्ये 71 किलो गांजा किंमती 8 लाख 43 हजार रुपयांचा जप्त करण्यात आले होते. त्याचे विरुद्ध पो. ठाणे रावणवाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर परिवार हा गांजा विक्री व्यवसायात बऱ्याच काळापासून गुंतला आहे. याबाबत वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे पुढील सखोल तपास करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular