Tuesday, May 26, 2026

तलावात आढळला तरुणाचा मृतदेह; घातपात की, आत्महत्या? तपास सुरू

माँ धुकेश्वरी मंदिर परिसरातील पवन तलावातील घटना..
देवरी, (गोंदिया) : देवरी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या माँ धुकेश्वरी मंदिर परिसरात असलेल्या पवन तलावात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी एका युवकाचा मृतदेह तरंगताना परिसरातून जाणाऱ्या नागरीकांना दिसून आला. नागरीकांनी या घटनेची माहिती तात्काळ देवरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच देवरी पेलिसांनी घटना स्थळ गाठत तपासणी केली. सदर मृत व्यक्ती हा देवरी येथील सांरग पुरूषोत्तम देशपांडे (वय २९, रा. देवरी) असल्याची ओळख पटली. ज्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सविस्तर असे की, शुक्रवारच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास सदर घटना निदर्शनात येताच सारंगची हत्या की, आत्महत्या? या चर्चेला उधान आले आहे. सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले आहे. सारंग देशपांडे याची हत्या कि, आत्महत्या हे शविच्छेदनानंतर समजुन येणार असून या घटनेने देशपांडे व मित्र परीवारात शोककळा पसरली आले. पुढील तपास देवरी पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular