Friday, April 17, 2026
spot_img

बाईक रॅलीत 350 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग

गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम
गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे १३ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधी दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात आज, गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पोलीस मुख्यालय (कारंजा) गोंदिया येथुन बाईक रॅली आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक भामरे यांनी हिरवी झंडी दाखवून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली. सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम बाईक रॅली मध्ये 300 ते 350 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.

या बाईक रॅलीची सुरुवात पोलीस मुख्यालय कारंजा येथुन झाली. ही रॅली पोलीस मुख्यालय, गोंदिया – शासकीय आय.टी.आय.- फुलचुर नाका – मनोहर चौक- जयस्तंभ चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- रेल्वे उडान पुल – जे.एम. हायस्कूल – राणी अवंतीबाई चौक – कुडवा नाका एन.एम.डी. कॉलेज रोड – पाल चौक – रेल्वे अंडरपास – यादव चौक, भवानी चौक, चांदनी, चौक गांधी चौक, पो.स्टे. गोंदिया शहर रोड – गोरेलाल चौक- नेहरु चौक- आंबेडकर चौक- जयस्तंभ चौक असे गोंदिया शहर व रामनगरचे विविध मार्गाने फिरवून वाहतुक शाखा गोंदिया येथे सदर बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. याद्वारे नाशामुक्त समाज घडविण्याकरिता गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात आली. गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्दर्शनाखात उपविभागीय पोलीस अधीकारी गोंदिया रोहिणी बानकर, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भाष्कर, रा.पो.नी. राजेश सरोदे, नक्षल सेलचे पो.उप. निरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी बाईक रॅलीचे यशस्वी नियोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular