गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे फिट इंडिया मोहीम अंतर्गत श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजता पोलिस मुख्यालय गोंदिया येथुन १०कि.मी. सायकल्थॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सायकल्थॉन स्पर्धेचे सुरुवात पोलीस मुख्यालय गोंदिया येथुन करून आय टी आय -फुलचूर नाका -जयस्तंभ चौक-आंबेडकर चौक -नेहरू चौक पर्यंत ५ किमी जाणे व परत नेहरू चौक-जयस्तंभ चौक -फुलचूर नाका-पोलीस मुख्यालय गोंदिया येथे समापन करण्यात आले. सदर सायकल्थॉन स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्दर्शनाखाली गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर , आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, तिरोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झारकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृहचे रामदास शेवते, जिल्ह्याचे सर्व पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय, संडे सायकलिंग ग्रुपचे सदस्य व स्थानिक महिला व पुरुषांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सहभा
ग घेतलेल्या स्पर्धकांपैकी पुरुष गट व महिला गट मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या धावकांना पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांचे हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्दर्शनाखाली गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर , आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, तिरोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झारकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृहचे रामदास शेवते, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नागेश भाष्कर, रापोनी राजेश सरोदे, यांनी सदर स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.





