Wednesday, June 24, 2026

छत्रपती शिवाजी संकुलात गणेशजींचे थाटात विसर्जन

देवरी, (गोंदिया) : देवरी येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे गणेशजींचे थाटात विसर्जन मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी करण्यात आले. शनिवार 27 ऑगस्ट 2025 रोजी संकुलामध्ये गणेशजींची स्थापना करून गणेश उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर सात दिवसांनी त्यांचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. या सात दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा व विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घेण्यात आले. यावर्षी प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे चार गट करुन “आध्यात्मिकता आणि आधुनिक जीवन” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली व त्यातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे सचिव अनिलकुमार येरणे व जयश्रीताई येरणे, कोषाध्यक्षा कृ.स.तं.शि.सं. देवरी यांचे शुभहस्ते बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तदनंतर ढोल ताश्याच्या गजरात संकुलामधून गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संकुलातील सर्व, प्राचार्य, शालेय विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular