Monday, September 14, 2026
spot_img
spot_img
spot_img

गोंदिया येथून फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सुरू करा

आ. विनोद अग्रवाल यांची मागणी; रेल्वे मंत्रालयाला पत्र
गोंदिया : गणेशोत्सव व नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया येथून विविध प्रमुख शहरांकडे फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालविण्यात यावे, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे. या संदर्भात रेल्वेमंत्री वैष्णव यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून डीआरयुसीसाचे सदस्य विनोद चांदवानी व हरीश अग्रवाल यांनीही रेल्वे मंत्र्यांकडे अतिरिक्त गाड्या चालविण्याचे आवाहन केले आहे.
सणाच्या दिवसांत गोंदिया येथून मुंबई, पुणे, नागपूर व इतर प्रमुख शहरांकडे प्रवाशांची मोठी गर्दी होते. नियमित गाड्यांमध्ये आसन उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या काळात अतिरिक्त फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालविणे हे प्रवाशांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घेवून फेस्टिवल रेल्वेगाड्या सुरू करण्यात यावे, अशी मागणी आ.विनोद अग्रवाल यांनी केली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार दक्षिण-पूर्व-मध्य डीआरयुसीसाचे सदस्य विनोद चांदवानी व हरीश अग्रवाल यांनीही रेल्वे मंत्र्यांकडे अतिरिक्त गाड्या चालविण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भातील पत्राची प्रत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे, बिलासपूरचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनाही पाठविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular