Saturday, April 18, 2026
spot_img

30 किलो चांदी चोरणाऱ्या चोरट्यास 48 तासात केले जेरबंद

38 लाख रूपये किंमतीची चांदी जप्त : गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी
गोंदिया : राजकोट (गुजरात) येथील थोक व्यापार्‍यांकडून 50 किलो चांदी गोंदिया येथील एका ज्वेलर्स दुकानदारांकडून खरेदी करण्यात आली होती. यातील 20 किलो चांदीचे एक पार्सल त्या व्यापार्‍याला प्राप्त झाले तर दुसरे 30 किलो चांदीचे पार्सल अज्ञात चोरट्याने अफरातफर केली होती. चोरीस गेलेली चांदी जवळपास 38 लाख रूपये किंमतीची होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 18 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपासकार्य हाती घेत अवघ्या 48 तासात त्या चांदी चोरट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले. त्याच्याकडून 38 लाख रूपये किंमतीची 30 किलो चांदी हस्तगत करून बेड्या ठोकल्या. जिया अली कमर अली सय्यद (वय 35, रा. बाजार चौक, रामगनर, गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कामगिरी शहर पोलिसाच्या पथकाने केली.
सविस्तर असे की, फिर्यादा रोहीत रमेश सोनी (वय 36, रा. वसंत टाल, रामनगर) यांची दुर्गा चौक गोंदिया येथे रोहित ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. दुकानासाठी फिर्यादीने 1 सप्टेंबर रोजी राजकोट (गुजरात) येथील सोना-चांदीचे थोक व्यापार्‍याकडून मोबाईल अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून 50 किलो चांदीची ऑर्डर दिली होती. मागणीनुसार खरेदी केलेली 50 किलो चांदी 30 व 20 किलो असे दोन पार्सल गोंदियाकडे कुरीयरच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. यातील 20 किलो चांदीचे पार्सल रोहित ज्वेलर्स यांना मिळाले. तर दुसरे 30 किलो चांदीचे पार्सल अज्ञात चोरट्याने अफरातफर केले. हे प्रकरण लक्षात येताच फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात 18 सप्टेंबर रोजी तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून तपासकार्याला सुरूवात केली. दरम्यान डी.बी.पथकातील पोउपनि अनिल डोंगरवार व पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्हयात वी.आय.पी. पार्सल सर्विस, बाडी नागपुर, बजाज नगर भंडारा, तुमसर, तिरोडा, शेखावत ट्रांसपोर्ट गोंदिया यांची कसून चौकशी केली. चौकशी तसेच सुत्राकडून मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे संशयीत इसम जिया अली कमर अली सय्यद (35) रा.बाजार चौक, रामगनर याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता 30 किलो चांदीचे पार्सल अफरातफर करुन घेवून गेल्याचे कबुल केले. यावरुन त्याला अटक करून अपहार 38 लाख रूपये किंमतीची 30 किलो चांदी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकुण 38 लाख 30 हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडुन जप्त करण्यात आला.

यांची कामगिरी…
ही कामगिरी पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पोउपनि अनिल डोंगरवार, घनश्याम थेर, पोलीस हवालदार कवलपालसिंग भाटीया, सतिश शेंडे, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, पोलीस शिपाही सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश राबते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश वंजारे, अजय बोपचे, सनोज सपाटे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular