सडक अर्जुनी, (गोंदिया) : भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून फुलीचंदजी भगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोसमतोंडी येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य व्ही. पी. टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टी. आर. झोडे, एच. टी. बिसेन, कु. एम. एम. कटरे, कु. एन. व्ही. हिवसे, जी. डी. रहांगडाले व जी. जी. काशीवार यांच्या नियोजनात कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी विद्यार्थी मुख्या. अंकीत सुरसाऊत होता तर प्रमुख पाहुणे म्हणून अपूर्व टेंभुर्णे, कु सिमरण काशिवार कु. सलोनी मेश्राम व कु. प्रिया टेंभरे यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे संचालन कु. हिमानी येडे हिने केले तर आभार कु रिया सातभावे हिने मानले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांच्या भूमिका उत्स्फूर्तपणे पार पाडल्या. अंकित सुरसाऊत याने मुख्याध्यापकाची, कु. मोनिका शरणागत हिने लिपिकाची तर सतीश मेश्राम, खोमेश चौधरी, तन्मय चौधरी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक व सेवकांच्या विविध भूमिका साकारल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची जबाबदारी स्वीकारून वर्गात अध्यापन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचे कार्य, जबाबदारी, शिस्त, नियोजन तसेच विद्यार्थ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा प्रत्यक्ष अनुभव . होय,” हा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण विद्यालयात आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.





