Wednesday, January 21, 2026
spot_img

बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी

देवरी (गोंदिया) : देवरी तालुक्यातील दक्षिण देवरी वनपरीक्षेत्र बोंडे बीटाअंतर्गत येणाऱ्या धमदीटोला येथे बिबट्याच्या हल्ल्यात ६ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. जानवी किशोर कुमरे असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. जानवी ही आपल्या कुटुंबासोबत धमदीटोला पासून अंदाजे एक ते दीड किलोमीटर दूर असलेल्या शेतामध्ये गेली होती. कुटुंबातील सदस्य शेतावर काम करत असताना अचानक बिबट्याने जानवीवर हल्ला केला. मोक्यावर घरातील लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट तिथून जंगलात पसार झाला. या घटनेमुळे धमदीटोला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या स्थितीत बिबट्याच्या झालेल्या हल्ल्यात मुलीला डोक्याला जखम झाला. दरम्यान ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे प्राथमिक उपचारानंतर जानवीवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. वनविभागाने रात्री जंगलालगत शेत शिवारामध्ये किंवा गावांमध्ये जंगली प्राण्यांचा वावर असल्याने सावध रहावे. तसेच बिबट्यापासून बचाव करण्याकरिता घरालागत झाडी झुडपे साफ व स्वच्छ ठेवणे, घरातील कोंबड्या, बकरे व पाळीव प्राण्यांना घरालागत मोकळे न ठेवता बंदिस्त आवारात ठेवणे यासारख्या खबरदारी घेण्याचे आवाहन देवरी वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular