Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

तिरोडा-काचेवानी रेल्वेफाटक चार दिवस राहणार बंद

गोंदिया : तिरोडा-काचेवानी रेल्वे मार्गावरील रेल्वेफाटक क्र. 520 च्या गर्डर विखंडन कामासाठी हे रेल्वेफाटक 27 ते 30 डिसेंबर दरम्यान बंद राहणार आहे. सुरक्षित व गतीशील रेल्वे परिचलन हा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा उद्देश आहे. सोबतच रेल्वे फाटकामार्गे वाहनांची सुरक्षीत व बाधारहित वाहतूक व्हावी यादृष्टीने विविध कामे केली जातात. यातंर्गत तिरोडा-काचेवानी दरम्यान असलेला रेल्वे फाटक क्र. 520 वरील गर्डर विखंडनाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी हे रेल्वेफाटक 27 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून 30 डिसेंबर रात्री 10 वाजतापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत रस्ते वाहतूक फाटक क्र. 521 मार्गे वळविण्यात आली आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे डीसीएम यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular