आमगाव, (गोंदिया) : आमगाव राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश असाटी होते. या प्रसंगी गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, अर्जुनी मोरगावचे राजकुमार बरोले, आमगावचे संजय पुराम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच रमेशकुमार अग्रवाल, गोंदिया राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, माजी आ. केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, म्हाडाचे माजी अध्यक्ष नरेश माहेश्वरी, माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, भाजप जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे, आमगाव काँग्रेसचे अध्यक्ष संजय बहेकर व आमगाव असोसिएशनचे अध्यक्ष दीपक अग्रवाल उपस्थित होते. प्रास्ताविकात मुकेश अग्रवाल यांनी संघटनेच्या कार्याची संपूर्ण माहिती दिली. यावेळी सुरेश असाटी यांनी महुआ फुलावरील बंदीमुळे महुआची फुले वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या गरजूंना तोटा सहन करावा लागत असल्याने महाराष्ट्रातील महुआ फुलावरील बंदी तात्काळ हटविण्याची विनंती आमदारांना केली. प्रसंगी आ. अग्रवाल यांनी आमगाव नपची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. आमदार पुराम व बडोले यांनी राईस मिलर्स व व्यापारी वर्गाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. संचालन पूजा चौहान यांनी केले. आभार लोकेश अग्रवाल यांनी मानले.
राईस मिलर्स असोसिएशनतर्फे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार
RELATED ARTICLES



