Wednesday, January 21, 2026
spot_img

लोखंडी पिस्तूल व जिवंत काडतूससह दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
गोंदिया : नववर्षाच्या आगमनावर 1 जानेवारी रोजीच्या रात्री रिसामा परिसरात अवैध शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. आरोपीकडून एका लोखंडी पिस्तुल व एक जिवंत काडतुस अंदाजे किंमत 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. ही कारवाई 4 जानेवारी रोजी रात्री पेट्रोलिंगच्या दरम्यान करण्यात आली. नरेश उर्फ शैलेश सुरेश तिराले (वय 34 वर्षे, रा.फुक्किमेटा ह.मु. रिसामा ता. आमगाव) व इजाज इस्माईल खान (वय 35 वर्षे, रा. मामा चौक, गोंदिया) असे आरोपींचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात शनिवार, 4 जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे आमगाव परिसरात अवैध कृती करणारे / अवैध शस्त्र बाळगणारे/ चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध/ गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पथकास रिसामा आमगाव येथील स्थानिक नागरीकांनी माहिती प्राप्त झाली की, 1 जानेवारी 2025 रोजी नरेश तिराले हा त्याच्या जवळील असलेल्या अग्निशस्त्रा द्वारे लोकांच्या मनात भिती घालुन दहशत माजवत होता. मात्र त्याच्या भितीमुळे लोकांनी त्याचेविरूध्द तक्रार दिलेली नाही. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली. वरिष्ठांच्या निर्देश सूचना परवानगीने नमुद इसम व त्याच्या ताब्यातील अनिशस्त्राबाबत खातरजमा शहानिशा करून मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी-अंमलदार यांनी 4 जानेवारी 2025 रोजी रात्री दरम्यान छापा घालून कारवाई केली. यात अवैधरित्या विना परवाना अग्निशस्त्र बाळगून दहशत माजविणारा नरेश उर्फ शैलेश सुरेश तिराले (वय- 34 वर्षे, रा.फुक्किमेटा ह.मु. रिसामा ता. आमगाव, जिल्हा- गोंदिया) यास एका लोखंडी पिस्तुल व एक जिवंत काडतुस किंमती अंदाजे 35 हजार रूपयांचा सह ताब्यात घेण्यात आले. त्यास त्याचे ताब्यात अवैधरित्या मिळून आलेल्या अग्निशस्त्राबाबत सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र इजाज इस्माईल खान (वय – 35 वर्षे, रा. मामा चौक, गोंदिया) याचेकडून आणल्याचे सांगीतले. यावरून इजाज खानला सुध्दा ताब्यात घेण्यात आले. विनापरवाना अवैधरित्या अग्नीशस्त्र (पिस्तुल) बाळगुन सर्व सामान्य जनतेच्या मनात अग्निशस्त्राद्वारे भीती निर्माण करून दहशत पसरवील्याबद्दल नमूद दोन्ही आरोपीताविरूध्द कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदयान्वये आमगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आले. दोन्ही आरोपी यांना जप्त मुद्देमाल (पिस्तूल, काडतूस)सह आमगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील कारवाई प्रक्रिया आमगाव पोलीस करीत आहेत.

यांनी केली कारवाई…..
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी नित्यानंद झा यांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पो.उप.नि. शरद सैदाने, पोलीस अंमलदार पो. हवा. राजु मिश्रा, महेश मेहर, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, सुजीत हलमारे, पो.शि. संतोष केदार, अजय रहांगडाले, दुर्गेश पाटील, चापोशि. मुरली पांडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular