Tuesday, August 25, 2026
spot_img
spot_img
spot_img

नागराधाम येथे भाविकांसाठी शेडचे बांधकाम पूर्ण

खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांतून प्रादेशिक पर्यटन विकासासाठी ३० लाखांचा निधी
गोंदिया : तालुक्यातील नागराधाम येथे प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भगवान भोलेनाथ मंदिर परिसराच्या विकासाला आता आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या ३० लाख रुपयांच्या निधीतून मंदिरासमोरील परिसरात भाविकांसाठी शेडचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
नागराधाम येथील भगवान भोलेनाथ मंदिराला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना ऊन, पाऊस तसेच प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळावे आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या शेडची उभारणी करण्यात आली आहे. खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून नागराधामच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा अधिक विकास करण्यावर भर दिला जात आहे. नवीन शेडमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होऊन त्यांना दर्शनासाठी अधिक सोयीस्कर वातावरण उपलब्ध होणार आहे. नागराधाम हे धार्मिक श्रद्धेचे केंद्र असण्यासोबतच पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याबरोबरच परिसराच्या सौंदर्यीकरण व सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली जात आहेत. नागराधामचा पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच परिसरातील नागरिकांसाठीही रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणारे हे शेडचे बांधकाम नागराधामच्या विकासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular