जिल्हा पोलिस प्रशासनाची धाड कारवाई
गोंदिया : अवैधधंदे व व्यवसायावर आळा घालण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी दिले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देश एवं मार्गदर्शनात जिल्हा पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध धाड कारवाई करून चौघांना जेरबंद केले. ही कारवाई ६ मार्च रोजी आमगाव व डुग्गीपार पोलिसांनी केली. या कारवाईत 9 किलो 867 ग्रॅम गांजा, एक मोटर सायकल, मोबाईल हँडसेट, कॉलेज बॅग असा एकुण 2 लाख 53 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहनलाल साधुजी बघेले (वय ५०, रा. सितेपार), कार्तिक शिवेंद्र कवरे (वय २०, रा. डुंडा), आदित्य ब्रम्हानंद धनविजय (वय २२, रा. खैरीदिवान जि. भंडारा) व विनय खुशाल बारापात्रे (वय २१, रा. आंधळगांव जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जिल्ह्यातील अवैधधंदे व व्यवसायावर आळा घालण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी दिले आहेत. त्यानुरूप जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांकडून पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध प्रभावी धाड कारवाई करण्याचे निर्देश सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हास्तरावर एन.डी. पी. एस. कायद्यान्वये कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून 6 मार्च रोजी वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी, साठा, वापर, विक्री व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मोहीम छेडत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच डुग्गीपार येथील पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध धाड कारवाई करून चौघांना जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी मोहनलाल साधुजी बघेले (रा. सीतेपार) याच्या राहत्या घरी धाड टाकण्यात आला. या घरझडतीत ताब्यातून विक्रीकरीता साठवून ठेवलेला 6 किलो 886 ग्रॅम ओलसर, पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किंमती 1 लक्ष 37 हजार 720 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आमगाव पोलिस ठाणे येथे NDPS कायद्याचे कलम 8(क), 20, 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. तसेच पोलीस ठाणे डुग्गीपार पोलीस पथकाने आरोपी कार्तिक शिवेंद्र कवरे, आदित्य ब्रम्हानंद धनविजय, विनय खुशाल बारापात्रे यांना डुंडा पांढरी फाट्यावर वाहतूक करताना संशयावरून सापळा रचून कारवाई करण्यात आली. त्यांचे ताब्यातून अवैधरित्या 2 किलो 981 ग्रॅम ओलसर, पाने, फळे, बिया मिश्रित गांजा 59हजार 620 रुपये, एक मोटर सायकल किंमती 50 हजार, व ईतर साहित्य मोबाईल हँडसेट, दोन कॉलेज बॅग किं. 5700/- असा एकुण 1 लाख 15 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान तिन्ही आरोपीविरुद्ध पो ठाणे डुग्गीपार येथे NDPS कायद्याचे कलम 8(क),20,29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे दिशानिर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी विवेक पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.उप.नि. शरद सैदाने, अंमलदार राजू मिश्रा, भुवन देशमुख, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश पाटील, राम खंदारे यांनी तसेच पोलीस ठाणे डुग्गीपारचे पो. नि. मंगेश काळे यांचे मार्गदर्शनात सपोनी बांबोळे, पोलीस अंमलदार अग्निहोत्री, जगदीश मेश्राम, रणजीत भंडारकर, हरिणखेडे, इंगळे, खोब्रागडे यांनी केली.





