Thursday, September 17, 2026
spot_img
spot_img
spot_img

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन आज, 8 मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, सुरेश हर्षे, पूजा अखिलेश सेठ, अश्विनी पटले, माधुरी नासरे, नेहा तुरकर, सुधा राहंगडाले, कीर्ति पटले, बिरजुला भेलावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी, आज महिला सर्वच क्षेत्रात उंच उंच भरारी घेत उत्कृष्ठ कार्य करीत आहेत. महिलांचा सामाजिक,आर्थिक, राजकीय क्षेत्रात योगदान नाकारता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असल्याने राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक पुढे येण्याची गरज आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करू. सरकारने महिलांच्या प्रगती व उन्नती करीता लाडली बहीण व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता अनेक योजना अंमलात आणल्या आहेत असे प्रतिपादन करीत महिला दिनाच्या राजेंद्र जैन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित महिला पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात नानू मुदलियार, केतन तुरकर, राजू एन जैन, टी एम पटले, डी यू राहंगडाले, आशा पाटिल, सरला चिकलोंडे, रजनी गिरिपुंजे, सुशीला हलमारे, जया धावड़े, शर्मिला पाल, पायल बग्गा, रुचिता चौहान, संगीता माटे, पर्वता चांदेकार, गीता चौधरी, सुनीता थेर, पुस्तकला माने, अर्चना ताराम, सीमा शेन्डे, सुरेखा रहिले, सुमन बिसेन, तोमसीना नागपुरे, ज्योत्स्ना लिल्हारे, लता राहंगडाले, सोलानी ब्राम्हणकर, वनिता कोरे, रिना रोकडे, मोनिका सोनवाने, वंदना डोंगरवार, पंचशिला मेश्राम, विश्रांति थुलकर, गुणवंता कापगते, पुष्पमाला बड़ोले, खिलवंता येडे, क्रिष्ना कोरे, पुष्पा डोंगरवार, संगीता कोवे, उषा होड़कर, पुष्पा गुप्ता, प्रमिला बड़वाईक, ललिता चौधरी, अनिता हरिनखेड़े, राधिका कोहड़े, संगीत आम्बेडारे, सरोज सिंगन्धुपे, लष्मी बाई, विमला उइके, अर्चना चौधरी, रविकला नागपुरे, विमला श्रीभद्रे, मुमताज खान, भूमेश्वरी इनवाते, उमा सिंग, किरण रहमतकर, प्रमिला मानकर, योगिता मेश्राम, लता मेश्राम, यशोदा मेश्राम, निशा मानकर, अरुणा लिल्हारे, तोमसी नागपुरे, सुरेखा रहिले, चेतना कांबले, प्रमिला गावड़कर, मंजूषा बारसागड़े, चेतना ताई, ममता राहंगडाले, किरण राहंगडाले, सुंदरी तांडेकर, पायल बागड़े, चेतना पराते, रीना गौतम, वर्षा राहंगडाले, खुशबू चौधरी, सोनम मेश्राम, पुर्णिमा मेश्राम, प्रकाश बरिया, शैलेष वासनिक, शरभ मिश्रा सह मोठ्या संख्येत महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular