Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

नागरिकांच्या सुविधांकरिता गोंदिया जिल्हा पोलीस दलाची ‘नविन वेबसाईट कार्यान्वित’

आता थेट करता येणार ऑनलाईन तक्रार
गोंदिया : पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक नित्यांनंद झा, कॅम्प देवरी यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्हा पोलीस दलाची नविन वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर वेब साईटवर गोंदिया जिल्हा पोलीस दलाची अद्यावत माहिती तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शाखा यांची माहीती अद्यावत उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधीत कामाकरीता आवश्यक असणारी माहीती याद्वारे मिळणार आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यांनंद झा, यांचे निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यातील नागरीकांना या वेबसाईटवर *”सिटीझन कॉर्नर” या टॅबमध्ये* प्रथमच ऑनलाईन कंप्लेट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी तक्रार करण्याकरीता यावर केलेल्या तक्रारीवर संबंधित पोलीस ठाणेतर्फे कारवाई होणार आहे. त्यासोबतच कोणत्या नागरीकाने काय तक्रार केली व त्या तक्रारीवर संबंधीत पोलीस ठाणेने काय कारवाई केली, हे थेट पोलीस अधीक्षक यांना समजणार आहे व ते याबाबत नियमीत आढावा घेणार आहेत. नागरीकांना वेबसाईटवर महिलांविषयी तक्रार, मुलांविषयी तक्रार, गुन्हे विषयक तक्रार, आर्थिक फसवणुकीची तक्रार, सायबर विषयी तक्रार, संपती विषयी तक्रार, मोबाईल हरविल्याची तक्रार, सायबर फसवणुक झाल्याची तक्रार तसेच भाडेकरुची माहिती व ईतर तक्रारी करण्याची सुविधा नागरीकांसाठी सदर वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्हयातील नागरीकांनी कार्यान्वित करण्यात आलेल्या नवीन वेबसाईटचा सुलभ जास्तीत जास्त वापर करून आपल्या तक्रारीचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular