Wednesday, January 21, 2026
spot_img

जंगलात अस्वल दर्शन; लेंढीजोब गाव परिसरात भीतीचे वातावरण

देवरी, (गोंदिया) : देवरी तालुक्यातील लेंढीजोब गावच्या जंगलात मंगळवार, २५ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान गावातील काही नागरिक मोहफुल वेचण्याकरिता, जंगलात जात असताना अस्वल दिसला. मात्र, त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याचबरोबर या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर असे की, सध्या मार्च महिन्याच्या दरम्यान मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू झाल्याने देवरी तालुकातील आदिवासी बहुल परिसराच्या गावात, मोहफुल वेचण्याकरिता नागरिक जंगलामध्ये जातात. दरम्यान मंगळवारी तालुक्यातील ग्राम लेंडीजोब या गावचे नागरिक मोहफुल वेचण्याकरिता जंगलामध्ये गेले असताना, अचानक अस्वलाचं दर्शन झाल्यामुळे, त्यांनी या अस्वलाचा फोटोशूट करून सोशल मीडियावर वायरल केला आहे. त्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अस्वलाच्या दर्शनामुळे गावात कुतूहलाचा विषय ठरला असून अस्वलाला पाहण्याकरिता गावातील सारे लोक जंगलाच्या दिशेने धावत सुटले. आणि त्याच बरोबर मोहफुल वेचणाऱ्या नागरिकांच्या मनात जंगलात अस्वल निघाली म्हणून भीतीचे वातावरण सुद्धा पसरले आहे.

एकटा न जाता तीन ते चार लोक एकत्र जावे…
आता मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू असल्यामुळे शक्यतो नागरिकांनी रात्री अपरात्री मोहफुल वेचण्याकरिता जंगलात जाण्याचे टाळावे. तसेच जंगलात एकटा न जाता तीन ते चार लोक मिळून एकत्र जावे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगली प्राणी हे पिण्याच्या पाण्याच्या शोधात गाव शेजारी येत असतात. यांच्यापासून सावध राहून स्वतःला सतर्क ठेवावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular