Sunday, January 18, 2026
spot_img

गो-तस्करी करणारे वाहन पकडले; ५ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त

देवरी तालुक्यातील डवकीटोला जवळील घटना
देवरी, (गोंदिया) : गोवंशाची तस्करी करणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप अतिशय वेगाने येणाऱ्या वाहनाला देवरी पोलिसांनी रोखून गोवंशासह एकूण ५ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात केले. ही घटना मंगळवार, १ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास देवरी पासून ५ किमी. अंतरावर असलेल्या डवकीटोला गावाजवळ घडली.
सविस्तर असे की, १ एप्रिल रोजी डवकीटोला रस्त्यावरून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनांमध्ये एकूण १३ गोवंश अमानुषरित्या कोंबून येत असल्याची माहिती पेट्रोलिंग दरम्यान देवरी पोलिसांना प्राप्त झाली. यावर पोलीस स्टाफसह तातडीने सापळा रचून आपल्या चमूकडून पाळत ठेवली व स्थानिक डवकीटोला गावाजवळ नाकाबंदी करून पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनाला (एम. एच.४० बी.जी. ४२५६) थांबवून चौकशी केली असता त्यात एकूण १३ गोवंश जनावरे सापडले. मात्र वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. देवरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून एकूण ५ लाख ७८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पशुवैद्यकीय अधिकारी देवरी यांचेकडून वैद्यकीय परीक्षण केले. त्यांना सुरक्षेकामी गौ शाळा येथे दाखल करण्यात आले. दोरीने बांधून वाहनात कोणतेही चारापाण्याची वैद्यकीय सुविधा न देता त्यांना क्रूर वागणूक देऊन त्यांना निर्दयपणे कोंबून भरलेल्या वाहन चालकावर कलम ११ (१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम ५ (अ) ९, महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा १९७६ अनन्वे गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा हवींद्र बडोले, पोना. समरीत, शिपाही निखारे, सैनिक ढवळे, सैनिक हटवार, सैनिक राऊत यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular