Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

पीएमश्री जि.प. हायस्कूलच्या ११ विद्यार्थ्यांचे सुयश

देवरी, (गोंदिया) : २२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या एनएमएमएस परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत स्थानिक देवरी येथील पीएमश्री जि.प.हायस्कूल च्या वर्ग आठव्या वर्गातील १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी एनएमएमएस स्कॉलरशिपसाठी ११ विद्यार्थी पात्र ठरले. यात मैथली चांदेवार, आयसू कुंभरे, आरुषी रामटेके, जयेश मडावी, बादल फुंडे, पुनम साखरे, चैतन्य मेश्राम, चिरायू भोंगारे, आभा आचले, विनय चनाप, यशस्वी कोरेटी ह्या पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. २००७-०८ शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञाची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे, असा योजनेचा हेतू आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एक हजार असे वर्षाला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता आठवीसाठी ही परीक्षा आहे. याच उद्देशातून स्थानिक देवरी येथील पीएमश्री जि.प. हायस्कूल येथील २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या आठव्या वर्गातील परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यापैकी एकूण १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ११ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शालेय शिक्षक, माता पालक यांना दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular