Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

बुध्दगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा!

राष्ट्रपतींच्या नावे बौद्धांचे निवेदन : भंते विनाचार्य यांच्या अटकेचा निषेध
गोंदिया : बुद्धगया टेम्पल ॲक्ट १९४९ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा. तथा भंते विनाचार्य यांच्या बेकायदेशीर अटकेचा विरोध करीत त्यांची तुरूंगातून सुटका करा, या मागणीसाठी गुरूवारी (ता.१५) पोलिस स्टेशन तिरोडा येथे बौद्ध बांधवांच्या वतीने धडक मोर्चा काढून राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजय बनसोड, महाप्रज्ञा बुध्द विहार समितीचे माजी अध्यक्ष अतुल गजभिये यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सचिव जितेंद्र दहाटे, भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष तुलाराम वैद्ये, महाप्रज्ञा बुध्द विहार समितीचे उपाध्यक्ष महेंद्र बडगे, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, मनोज वासनिक, तेजराम मेश्राम, रत्नाकर नंदागवळी, मनोज गेडाम, अरविंद ऊके, रमेश‌ नांदगावे, पंचशिलाताई रामटेके, रणजित कानेकर, मनिष वासनिक, प्रिती रामटेके, ॲड. नरेश शेंडे, अनमोल चव्हाण, मुकेश बरियेकर, सरोजताई बनसोड, भावनाताई गजभिये, नंदाताई वासनिक, भीमाताई देशभ्रतार, रेखाताई बनसोड, प्रियंकाताई मेश्राम, निकीताताई गडपाल, विद्वत्ताताई गजभिये, मनिषाताई मडामे, सुनिताताई दहाटे, रोशनीताई मेश्राम, अरविंद डोंगरे, लंकेश टेंभेकर, लारेंद्र गेडाम, प्रफुल्ल वैद्य, हर्षविन शेंडे, वैभव वासनिक, प्रज्वल गजभिये, वैशालीताई गजभिये, प्रशिक वैद्ये, उमेश मेश्राम, दानियल बनसोड, पृथ्वीराज मेश्राम, देवेंद्र कुमार सुखदेवे, उमेश बनसोड, विश्वजीत तिरपुडे, अमित कुंभलवार, अभिषेक डोंगरावर प्रामुख्याने उपस्थित होते. 12 मे 2025 रोजी बुध्द गया येथे शांततेच्या मार्गाने बौध्द भंते आणि उपासक आंदोलन करीत होते. दरम्यान डुंगेश्वरी पर्वतावर बौध्द बांधवांवर लाठी हल्ला करण्यात आला. उपासकांसह महिला व बौध्द भंतेंना मारहाण करण्यात आली. भंते विनाचार्य यांच्याशी अभद्र व्यवहार करून त्याना अटक करण्यात आली आहे. शिवाय बुध्द पौर्णिमेच्या दिवशी महाविहारातील तथागत बुध्दांची प्रतिमा झाकून त्याठिकाणात बुध्द धम्माच्या विसंगत पूजा अर्चना करून बुध्द धम्माचा अनादर करण्यात आला आहे. या सर्व घटनांचा निवेदनातून निषेध करण्यात आला आहे. बुध्द गया टेम्पल हे बौध्दांचे जागतिक वारसा स्थळ आहे. त्यामुळे बौध्द गया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून महाविहार है बौध्दांच्या स्वाधीन करावे. भंते विनाचार्य यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, त्याची तरूंगातून विनाशर्त मुक्तता करावी. बुध्द गया येथील मंदीरात बुध्द धम्माच्या विरुध्द व विसंगत आचरण बंद करावे, असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. बुध्द गया व आजूबाजूच्या परिसरातील बौध्द स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात. बौध्द लोकांना तथा पर्यटकांना मारहाण करणाऱ्या लोकांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे, तथा त्यांना मंदीर परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपतींच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

आंदोलनाला झाले दीडशे वर्ष…
बुध्द गया येथे तथागत गौतम बुध्दांना ज्ञान प्राप्त झाले. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी महाबोधी महाविहाराची निर्मीती केली. हे मंदीर बौध्दांच्याच ताब्यात होते. मात्र, 16 व्या शतकात घमंड गीरी नावाच्या पुजाऱ्याने पूजापाठ सुरू करून महाबोधी महाविहारावर अतिक्रमण केले. तेव्हा पासून हे मंदीर बौध्दांच्या स्वाधीन करण्याची मागणी होत आहे. 1891 पासून अनागारीक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना करून महाबोधी महाविहार बौध्दांच्या स्वाधीन करण्याची मागणी केली. तेव्हापासून बुध्द गया महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्याचे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला जवळपास दीडशे वर्ष झाले असून १९४९ मध्ये बुद्धगया टेंपल ॲक्ट तयार करून बौध्दगया येथे बौध्दांना डावलून इतर धर्मियांकडे मंदीराचे व्यवस्थापन सोपविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular