गोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाची युती बुधवार, २८ में रोजी झाली. यावेळी भाजपा जिलाध्यक्षा सीताताई रहांगडाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार भेरसिंग नागपुरे व महासचिव बाळा अंजनकर यांचा उपस्थित होते. महायुतीच्या वतीने सहकार पॅनल या नावानी बँकेची निवडणूक लढविली जाणार असून पॅनलचे संयोजक म्हणून आमदार परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार राजूकमर बडोले, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार संजय पुराम राहतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली. या सभेला विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, बाळाभाऊ अंजनकर, राजेंद्र जैन, भेरसिंग नागपुरे, हेमंत पटले, लायकराम भेंडारकर, खोमेशभाऊ रहांगडाले, विजय शिवणकर, झामसिंग येरणे, रचनाताई गहाणे, पंकज रहांगडाले, ऍड. येशुलाला उपराडे सहित अन्य उपस्थित होते.





