Tuesday, May 12, 2026

पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्ह्यात 884 विंधन विहिरी मंजूर

गोंदिया : जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हा परिषद गोंदिया मार्फत पाणीटंचाई टप्पा तीन अंतर्गत ८८४ विंधन विहिरींच्या खोदकामाचा शुभारंभ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना भेंडारकर म्हणाले, या विंधन विहिरींच्या माध्यमातून गावागावात भरपूर पाणी उपलब्ध होईल. पाणीटंचाईचे प्रमाण कमी होईल व नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करता येईल. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ. कविताताई कापगते, सरपंच सौ. सरस्वता चाकाटे, उपसरपंच. किशोर बेलखोडे, नगरसेवक राधेश्याम भेंडारकर,आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष तुलाराम मारगाये, खाद्य वितरण व्यवस्थेचे संचालक लैलेश्वर शिवणकर, अशोक कापगते,. राकेश पहिरे, ग्रामपंचायत सदस्य संजय बनसोड,. संजय चव्हारे, श्रीधर चूटे,. नंदराम चुटे, दामो चुटे, माधव शिवणकर, रमेश चुटे,रमेश शिवणकर, विजयजी धानगाये,. मदनजी नाईक, हरि आंदे, डूलीचंद घरतकर उपस्थित होते.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, जिल्ह्यातील जलसंधारण व पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular