सायकलिंग संडे ग्रुपला 8 वर्ष पूर्ण : शहरात सायकल चालवत सायकल चालविण्याचा दिला संदेश…
गोंदिया : गोंदिया शहरातील सायकल संडे या ग्रुपला आठ वर्षे पूर्ण झाले असून या आठ वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने तहसीलदार समशेर पठाण यांनी या सायकलिंग संडेमध्ये सहभाग घेत त्या निमित्त सायकलिंग संडे ग्रुपला शुभेच्छा दिल्या. हा ग्रुप असाच वर्षांवर शंभर वर्षापर्यंत चालू राहावा व लोकांना सायकलिंग चालवण्याचे संदेश आणि सायकल चालवत लोकांनी आरोग्य व पर्यावरण सुरक्षा करावी, असेही यावेळेस त्यांनी संडेच्या सदस्यांना संदेश दिले.

सायकलिंग संडेला आठ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आज (ता. 15) गोंदिया शहरात गुरुद्वारा येथून या सायकलिंग संडेला सुरुवात झाली. शहरात हे सायकल रॅली काढत लोकांना सायकल चालवण्याचे संदेश देण्यात आले. तर यावेळी तहसीलदार पठाण यांना हिरवळ टीम यांच्या कडून वृक्ष देखील भेट देण्यात आली. सायकलिंग संडे ग्रुपच्या सदस्यांनी व तहसीलदार शमशेर पठाण यांच्या हस्ते केक कापून हा आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या महोत्सव साजरा केला. यावेळी हायरवार टीमच्या विकी सारे व त्यांची सदस्य तसेच सायकलिंग संडेचे अध्यक्ष मंजू कटरे, सचिव रवी सपाटे, कोषाध्यक्ष विजय येडे, प्रवीण हालानी, भगीरथ जिवानी, विजय सोनी, अंजलि लूंगवानी, निखिकुमार रत्नाकर, त्रिवेणी उके, भावना शेंडे, मोहित चौधरी, सुनील कावळे, सुनिल श्रीवास्तव, दीपाली वाढई, वैशाली भांडारकर, संगीता गायधाने, दीपाली मेश्राम, भाग्यश्री उपरीकर, गारगी, मुन्नालाल यादव, शुभम भीमटे, रोमी गुलाहाटी, नविन दहिकर, ऋद्धि हलानी, सामिधा रहांगडाले, यश सेलम, सोपन देशमुख, गोपाल रहांगडाले, डॉ. प्रमेशकुमार रहांगडाले आदींनी सायकल चालवत सहभाग घेतला.





