Friday, April 17, 2026
spot_img

ट्रॅक्टर चोरट्यांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

गोंदिया : शेतात उभा करून ठेवलेला ट्रॅक्टर चोरी झाल्याचा प्रकार 19 जून रोजी तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी शिवारात उघडकीस आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवून तीन आरोपींना जेरबंद केले. राकेश मुरलीधर राहांगडाले (वय 39, रा. घरसंसार सोसायटी, नविननगर, पारडी, नागपूर), सुधाकर धनराज कटरे व कृष्णा चैतराम आंबाडारे दोन्ही रा. येरली ता. तुमसर जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारकर्ते शेतकरी उमेश रहांगडाले रा. पालडोंगरी ता. तिरोडा यांच्या शेतात ठेवलेला 5.50 लाख किमतीचा इंडोफार्म कंपनीचा निळया रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35 एल 2551 गुरुवार, 19 जूनच्या रात्री अज्ञात चोरट्यानी पळवून नेला. या प्रकरणी 20 जून रोजी तिरोडा येथे भारतीय न्याय संहिता कलम 305 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपींची ट्रैक्टर चोरी करून कवलेवाडा गावाच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती मिळाली. तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे राकेश राहांगडाले याला ताब्यात घेत चोरी गेलेल्या ट्रॅक्टरबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे दोन साथीदार सुधाकर कटरे व कृष्णा चैतराम आंबाडारे यांच्यासह पालडोंगरी शिवारात उभा असलेला ट्रॅक्टर चोरी करून तुमसर येथे घेऊन गेल्याचे सांगून गुन्हा केल्याचे कबुल केले.Tractor thief त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला ट्रॅक्टर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 6 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी तिरोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद यांचे निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक वनिता सायकर, अंमलदार इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, दीक्षितकुमार दमाहे, चापोशी राम खंदारे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular