Monday, April 13, 2026
spot_img

निंबा येथे जागतीक आदिवासी दिन उत्साहात साजरा

गोरेगाव, (गोंदिया) : गोरेगाव तालुक्यातील निंबा कन्हारटोला येथे शनिवार, ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य रमेश पंधरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वर्षा विजय पटले, सदस्य संगीता कुंजाम, सामाजिक कार्यकर्ते विजय पटले, नंदलाल कुंजाम, रामजी कोडवते, पैकराम उईके, श्यामलाल कुंजाम, गजानन उईके, नेत्राम उईके, माणिक कोडवते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व सप्तरंगी झेंडावंदनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच वर्षा पटले यांनी जागतिक आदिवासी दिवसाचे महत्त्व मार्गदर्शनात सांगीतले की, ९ ऑगस्ट केवळ एक दिवस नसून तो आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा आणि अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९९४ मध्ये हा दिवस जाहीर केला असून, त्यामागचा उद्देश म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सुधारणा करणे, त्यांचा सांस्कृतिक वारसा जपणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे होय. आदिवासी समाजाने पिढ्यानपिढ्या निसर्गाचे रक्षण केले आहे. त्यांचे पारंपरिक ज्ञान, कला, संगीत, नृत्य व औषधी वनस्पतींचे ज्ञान हे अमूल्य आहे. आजही हा समाज शिक्षण, आरोग्य, हक्क व सांस्कृतिक जतनाच्या बाबतीत अनेक अडचणींना सामोरे जात आहे. संविधानाने अनुसूचित जमातींसाठी विशेष हक्क दिले असून, पेसा कायदा व वनहक्क कायदा यांसारखे कायदे प्रभावीपणे राबविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक नागरिक , आदिवासी समाजाने सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular