Monday, April 13, 2026
spot_img

३० हून अधिक रेल्वेगाड्या राहणार रद्द; सलग १६ दिवस प्रवाशांना बसणार फटका 

गोंदिया : ३१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत बिलासपूर-झारसुगडा रेल्वे मार्गावर चौथ्या रेल्वे लाइनचे काम होणार आहे. यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ३० हून अधिक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. ६ गाड्यांचे मार्ग बदलले गेले असून ५ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. तर १५ सप्टेंबरनंतर या सर्व गाड्या पुन्हा सुरू होणार आहेत.तब्बल १६ दिवस गाड्या रद्द असल्याने पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व गोवा येथे जाणार्‍या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. याच दरम्यान सण उत्सव असल्याने बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची अधिक तारांबळ उडणार आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत बिलासपूर ते झारसुगडा या २०६ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर चौथी रेल्वे लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५० किमीहून अधिक लाइनचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत रायगड रेल्वे स्टेशनला चौथ्या लाइनशी जोडले जाणार आहे. हे काम ३१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular