Thursday, April 30, 2026

ओवारा येथे तान्हा पोळा उत्साहात

आजी आमदार पुराम व माजी आमदार कोरोटे यांची उपस्थिती
देवरी, (गोंदिया) : लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरू पण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा’ साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा आयोजन ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने देवरी तालुक्यातील ओवारा (प्रथम प्रवेश द्वार जवळ) येथे लाकडी बैलाचा तान्हा पोळा रविवार, २४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उद्घाटन या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते आणि माजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी सर्वप्रथम लाकडी नंदी बैलांच्या पोळा स्थळी दीप प्रज्वलन करूण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी ओवाराचे सरपंच उमेश येरणे, माजी सरपंच कमल येरणे, हिरामन टेकाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष खोमेन्द्र बिसेन, माजी अध्यक्ष देवेन्द्र डोये, शिवसेनेचे आमगाव- देवरी विधानसभा समन्वयक बळीराम कोटवार, शिवसेनेचे देवरी तालुका प्रमुख जयपाल प्रधान, शेतकरी श्रीराम लांजेवार, मोतीराम मेहर, भाऊदास बिजलेकर, खुमराज टेटे यांच्यासह ओवारा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शेतकरी, महिला मंडळी, बालगोपाल मोठ्या संख्येत उपस्थित होते. दरम्यान सर्व लाकडी नंदी बैलाचे निरीक्षण करून उत्कृष्ट नंदी बैलाची निवड करून प्रथम पुरस्कार जर्मन गंज सरपंच उमेश येरणे यांचे कडून तर द्वितीय पुरस्कार चांदिची गोप देवरीचे प्रमोद रोकडे यांच्याकडून आणि तृतीय पुरस्कार टेबल पंखा देवरीचे प्राचार्य डॉ. सुजीत टेटे यांच्या कडून व चतुर्थ पुरस्कार इलेक्ट्रीक प्रेस ओवाराचे मोतीराम मेहर यांच्या कडून, तसेच पांचवा पुरस्कार दिवाल घडी ओवाराचे विजय खरडे यांच्या कडून सहभाग घेतलेल्या सर्व बाल गोपालांना समितीतर्फे प्रोत्साहनपर पुरस्कार वाटप प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार सहषराम कोरोटे व आमदार संजय पुराम यांनी उपस्थित सर्व बालगोपालांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular