Wednesday, January 21, 2026
spot_img

आंदोलनापूर्वी प्रलंबित समस्या व प्रश्न निकाली काढा

सेवानिवृत्त संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली आमदार विनोद अग्रवाल यांना भेट
गोंदिया : प्रलंबित समस्या व प्रश्नांना घेवून सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे. ३ सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला संघटनेच्या वतीने देण्यात आला. या पार्श्वभुमीवर संघटनेचे शिष्टमंडळाने आमदार विनोद अग्रवाल यांची भेट घेवून आंदोलनापूर्वी समस्या सोडविण्याची विनंती केली आहे.
सेवानिवृत्त शिक्षक, आरोग्य सेविका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे प्रलंबीत समस्या व प्रश्नांना घेवून वारंवार शासन, प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे. अनेक निवेदन, चर्चा करूनही प्रशासनातील अधिकारी दखल घेण्यास तयार नाहीत. दरम्यान २ सप्टेंबरपर्यत समस्या मार्गी लागल्या नाहीत तर ३ सप्टेंबरपासून उपोषण करणार, असा इशारा सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने देण्यात आले. या आंदोलनापूर्वी संघटनेच्या शिष्टमंडळाने आ. विनोद अग्रवाल यांची भेट घेवून समस्या व प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली. यावर आ.विनोद अग्रवाल यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्याशी संपर्क करून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या समस्यांवर चर्चा केली. तसेच शिक्षक व आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा, आंदोलनाची वेळ येवू देवू नका, अशा सुचना केल्यात. आरोग्य व इतर विभागाच्या संबधित अधिकार्‍यांनाही समस्यांना घेवून सुचित केले. आणि त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले. यामुळे प्रशासनाच्या भुमिकेकडे सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षकेत्तर, आरोग्य अधिकारी, कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे. शिष्टमंडळात सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे, डी.एल.गुप्ता, सहसचिव सुरेश आष्टीकर, तालुका अध्यक्ष डी.एम. दखने, बोपचे व सभासद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular