Thursday, June 25, 2026

आदर्श शिक्षक कैलास कुसराम यांचा शाळेतर्फे सत्कार 

सडक अर्जुनी, (गोंदिया) : तालुक्यातील कोसमतोंडी येथील जि.प. केंद्र प्राथमिक शाळा येथील कार्यरत शिक्षक कैलास कुसराम यांची जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. जि.प.केंद्र प्राथमिक शाळा कोसमतोंडी येथे ६ सप्टेंबर रोजी शिक्षक कैलास कुसराम यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक बी.जे. नेवारे, सहशिक्षक दिवाकर काशिवार, थोटे, आरसोडे मॅडम व वैद्य मॅडम व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular